दर्पण न्यूज पलूस /भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने 79 वा वाचन कट्टा एक जुलै 2026 रोजी वाचनालयात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संचालक चितळे उद्योग समूहाचे उद्योजक मकरंद चितळे होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी गुगल मीट द्वारे सर्व वाचन कट्टा सभासदांची संपर्क साधला. यावेळचा विषय माझे आई विषयीचे वाचन हा होता. या वाचन कट्ट्यावर अनेकांनी आई विषयक वाचलेल्या साहित्याचे सादरीकरण केले .
स्वागत प्रास्ताविक संयोजक सुभाष कवडे यांनी केले. यावेळी मोहन गायकवाड साहेब आणि सुनील भोसले यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्रीहरा जोशी जयंत केळकर मेजर उत्तम कांबळे श्रीनिवास गुरव हनुमंत शिंदे श्री सुभाष कवडे डी आर कदम जी जी पाटील सौभाग्यवती उर्मिला डिसले आधी सभासदांनी या वाचकट्ट्यावर आई विषयक साहित्याचे सादरीकरण केले.
अध्यक्ष मकरंद चितळे समारोप करताना म्हणाले , सर्वांना भावुक करणारा हा विषय आहे. खूप संस्कारक्षम विषय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान मोलाचे असते .
कार्यवाह वाचन कट्टा संयोजक सुभाष कवडे सर यांनी आभार मानले .संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे विद्या निकम माधव काटेकर यांनी केले यावेळी महादेवराव जोशी यांना वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पुढील वाचन कट्ट्यासाठी माझे संत वांड्मयाचे वाचन हा विषय देण्यात आला आहे.