दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :-
सायबर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर हरिश्चंद्र गरड, वय 25 वर्षे, रा.खेड ता. जि. धाराशिव यांचे भाउ नामे अनिकेत हरिश्चंद्र गरड, वय 22 वर्षे, यास दि. 01.05.2026 रोजीचे 00.01 ते आज पावेतो खेड येथे फेसबुकवर नोकरी संदर्भात जाहीरात पाहुण अज्ञात मोबाईल नं8562052678915 चा धारकाने व अज्ञात एजंटांनी संगणमताने फिर्यादीचे भावास थायलंड या देशात जॉब देण्याच्या बाहण्याने त्याची फसवणुक करुन त्याचे अपहरण करुन डांबुन ठेवुन त्याचेकडुन ऑनलाईन फ्रॉडचे काम करुन घेवुन छळवणुक करत आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर गरड यांनी दि.03.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे सायबर येथे भा.न्या.सं.कलम 127(2), 127(4), 143, 318(4), 61(2) सह कलम 66 (सी) (डी) आय.टी. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.