दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने):-
दि.04.06.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हे माला विषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत पोलीस ठाणे धाराशिव शहर हद्दीत आले असता पथकास गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटारसायकल ताब्यात बाळगुन आहे व तो आठवडी बाजार जवळ, धाराशिव येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळालेवरुन पथकान नमदु ठिकाणी जावून बातमी मधील इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्यांची नाव- अशिष उर्फे संतोष शंकर पारेकर असे सांगितले. पथकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारपुस करता त्याने सदरची मोटरसायकल ही चार महिन्या पुर्वी समर्थनगर धाराशिव येथुन चोरी केल्याचे सांगितल्याने. नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याचे कडून अंदाजे 20,000 ₹ किंमतीची मोटरसायकल जप्त केली. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरुन सपोनि श्री. अमोल मोरे, पोहेकॉ/ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, मपोह/ शोभा बांगर चालक पोलीस अमंलदार- दहीहंडे यांच्या पथकाने केली आहे.