साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांच्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन गणेश भक्तांचा सन्मान

भिलवडी. : साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे वतीने राबविण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करा आणि सुंदर पुस्तक भेट मिळवा या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व गणेश भक्तांना आज वाचनालयात झालेल्या एका विशेष समारंभात वाचनीय संस्कारक्षम पुस्तके भेट देण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी डी आर कदम सर होते तर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांचे हस्ते गणेश भक्तांना पुस्तके भेट देण्यात आली यावेळी 46 गणेश भक्तांना पुस्तके भेट देण्यात आली पर्यावरण पूरक सणांची गरज या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले या चर्चा सत्रात शरद जाधव डी आर कदम आणि सुबोध वाळवेकर समारंभात समारंभासयांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे संयोजन सूत्रसंचालन संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केले संजय गुरव सर यांनी आभार मानले.समारंभास संजय पाटील तारे साहेब उत्तम कांबळे मेजर व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते