कोल्हापूरात उद्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्नेहमेळावा : जिल्हाध्यक्ष धिरज रूकङे यांची माहिती

कोल्हापूरः अनिल पाटील
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा पहिला स्नेहमेळावा उद्या बूधवार कोल्हापूरातील उद्यमनगर येथील सामानी हाॅल ( इंजिनिअरिंग असोसिएशन हाॅल) येथे सकाळी 10 ते दूपारी 3 वाजे पर्यंत आयोजीत करण्यात आला आहे ‘अशी माहीती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष धिरज रूकङे यांनी दिली.
-उद्या होणार्या या स्नेहमेळाव्यात आपल्या संघटनेची पुढील दिशा,ध्येयधोरणे तसेच जिल्हा पदनियुक्ती संदर्भात चर्चा व हितगुज करून एकमेकांची ओळख होणार आहे.तसेच भविष्यात पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.सकाळच्या सत्रात
(*समन्वयक एम ए मास कम्युनिकेशन*
*शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर’चे शिवाजी जाधव यांचे पत्रकारितेची सद्यस्थिती*
आणी जेष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांचे या कार्यक्रमात ” .पत्रकारिता आणि आजची व्यवस्था”या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर या स्नेहमेळाव्यात ङिजिटल मिङियाला मान्यता मिळावी असा ठराव करून तो राज्याचे उपमूख्यमंत्री देवेंद्र फङवणीस यानां पाटविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील या संघाच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे.असे आवाहन ही जिल्हाध्यक्ष धिरज रोकङे यांनी केले आहे.
या स्नेहमेळाव्यात जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच स्नेहमेळाव्याला येणाऱ्या सदस्यांची “मोफत सभासद नोंदणी” केली जाणार आहे.