तेरखेड येथील मारहाणप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा नोंद

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :- तेरखेड येथील मारहाणप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे दिनांक 21/0 7 /2025 रोजी सायंकाळी सहा वाजता येडशी उड्डाणपुलाजवळ गैर कायद्याची मंडळी जमा करून शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने लोखंडे रोडने मारहाण करून जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीचे नाव विकी चव्हाण स्वप्निल पौळ यश माने राहणार तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव सुरज अवधूत राहणार अवधूतवाडी तालुका वाशी पांडू जाधवर राहणार रत्नापूर तालुका वाशी, जिल्हा धाराशिव अशी माहिती फिर्यादीने दिली फिर्यादीचे नाव अविनाश हरिदास मोराळे राहणार वडजी तालुका वाशी, जिल्हा धाराशिव भारतीय दंड व कलम118(1) 115(2) 352.351.(2) 351(3) 189(2) 191(2) 191(3) 190 असे गुन्हे नोंद झाले आहेत, अधिक तपास पोलीस करीत आहेत.