आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

अंकलखोप येथे शब्दसूर साहित्य व सांस्कृतिक मंचच्यावतीने 17 रोजी कोजागिरी साहित्य संमेलन २०२४, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

दिवसभर विविध कार्यक्रम: शब्दसूर " मंचचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

अंकलखोप  : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील शब्दसूर
साहित्य व सांस्कृतिक मंचच्यावतीने कोजागिरी साहित्य संमेलन २०२४ व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दिनांक १७ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत आशिर्वाद मल्टीपर्पज हॉल, अंकलखोप येथे होणार असल्याची माहिती ” शब्दसूर ” मंचचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कवडे ते म्हणाले ,” प्रथम सत्र. उद्‌घाटन सकाळी ९ वा. आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून होईल. निमंत्रित कवींचा कवी कट्टा सकाळी १० ते दुपारी ०१ बाजेपर्यंत आहे. महाराष्ट्रातील नामवंत कवी
. प्रा. प्रशांत मोरे (मुंबई), नारायण सुमंत (सोलापूर) प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी (शेटफळे) , प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार (चंदगड), प्रा. ज्ञानेश डोंगरे (आटपाडी) यांचा बहारदार कविता वाचन कार्यक्रम होईल.

द्वितीय सत्र दुपारी ठिक ३.०० वाजता सुरू होईल. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे आमदार डॉ. विश्वजीत कदम माजी कृषी व सहकार राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष डॉ. सुनिलकुमार लवटे (ज्येष्ठ विचारवंत) तर स्वागताध्यक्ष गिरीष चितळे (वितळे उद्योग समूह) आहेत.
पुरस्कारांची नावे व पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुढील प्रमाणे (स्व.) डॉ. पतंगरावजी कदम साहित्यरत्न पुरस्कार प्रा. इंद्रजीत भालेराव (ज्येष्ठ विचारवंत, परभणी) सौजन्य : सुभाष मगदूम मेमोरियल शिवशक्ती फाऊंडेशन, अंकलखोप
(स्व. ) कवी ज्ञानेश्वर कोळी साहित्य गौरव पुरस्कार. नवनाथ गोरे (युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त, जत ) सौजन्य: स्व. मामासाहेब पवार सत्यविजय सह‌कारी बँक लि., कुंडल, (स्व.) डॉ. बापूसाहेब चौगुले समाजरत्न पुरस्कार. आनंद शिंदे
Elephant Whisperer, (हत्तीचा मित्र), ठाणे
सौजन्य : श्री राजेश चौगुले फाऊंडेशन, अंकलखोप
, शाहीर श्री. आनंदराव केशव सुर्यवंशी शाहिरीरत्न पुरस्कार शाहीर नंदेश उमप, मुंबई , सौजन्य: वरद‌विनायक एच.पी. गॅस एजन्सी, अंकलखोप
युथ आयडॉल पुरस्कार लकी गर्ग (LKY Art Line) व्यक्ती-चित्रकार शिमला हिमाचल प्रदेश सौजन्य : साई इंडस्ट्रीज कुपवाड एम.आय.डी.सी., सांगली डी. के. ग्रुप, अंकलखोप
यावेळी मार्गदर्शक बाळासाहेब मगदूम, आप्पासाहेब सकळे, माजी सरपंच अनिल विभुते, *शब्दसूर” चे उपाध्यक्ष राजेंद्र खामकर , खजीनदार
वैभव यादव, सचिव प्रसाद कोळी, प्रकाश पाटील
, प्रदिप करजगार, अॅड. सौरभ पाटील, गौरव पाटील आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!