महाराष्ट्रताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्यात नऊ विशिष्ट सण, उत्सवांसाठी ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी सवलत

 

सांगली  : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वर्षभरातील 9 विशिष्ट सण, उत्सवादिवशी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी सवलत देण्याबाबत आदेश जारी केले आहेत.

विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून कार्यक्रमासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

शिवजयंती (१ दिवस), ईद-ए-मिलाद (१ दिवस), डॉ. आंबेडकर जयंती (१ दिवस), १ मे महाराष्ट्र दिन (१ दिवस), गणपती उत्सव (गणेश चतुर्थी, पांचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस, अनंत चतुर्दशी, असे ५ दिवस), नवरात्री उत्सव (अष्टमी व नवमी, असे २ दिवस), दिवाळी (१ दिवस लक्ष्मीपूजन), ख्रिसमस (१ दिवस), ३१ डिसेंबर (१ दिवस)

सदर सवलत घोषित शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. तरी घोषित शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदुषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामीण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना प्राधिकृत करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!