महाराष्ट्र

भिलवडी पंचशीलनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात साजरी

चार दिवस विविध सामाजिक उपक्रम : युवती -महिलांचा मोठा सहभाग अन् उत्साह

f

 

भिलवडी:;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पंचशील नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम, खासदार संजय काका पाटील यांनी भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भिलवडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत,  सेकंडरी स्कूल भिलवडी चे मुख्याध्यापक संजय मोरे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सायंकाळी भिलवडी गावातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघाली. युवती -महिलांचा मोठा सहभाग अन् उत्साह दिसून आला.

दरम्यान, भिलवडी येथील अंगणवाडी सेविका तेजस्वीनी जांभळे मॅडम यांनी आपल्या वडील भानुदास जिन्नाप्पा रांजणे आणि भाऊ लक्ष्मण भानुदास रांजणे यांच्या स्मरणार्थ पंचशील नगर येथील समाजबांधवांना सामाजिक कार्यासाठी भांडी भेट दिली.

या कार्यक्रमास भिलवडी येथील पत्रकार बांधवांनीही चांगले सहकार्य केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!