आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भिलवडी जायन्ट्सच्या जागतिक आरोग्य दिनीं आयोजित मोफत रक्त तपासणीत 302 जणांनी घेतला लाभ

भिलवडी;+  जागतिक आरोग्य दिनानिमित्त
जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी , जायन्ट्स सहेली,प्राथमिक आरोग्य केंद्र व महालॅबच्या माध्यमातून रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी *मोफत रक्त तपासणी शिबिर* आयोजित केले. शिबिरामध्ये
सी. बी.सी./ एच बी ए वन सी /कॅन्सर मार्कर /एच. बी. इलेक्ट्रोफोरेसिस तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिराचे उद्घाटन जायन्ट्स ग्रुपचे एनसीएप मेंबर उद्योजक श्री गिरीश चितळे ,श्री मकरंद चितळे, युनिट डायरेक्टर श्री सुहास खोत, सौ. भक्ती चितळे, भिलवडी जायंट्सचे अध्यक्ष श्री सुबोध वाळवेकर , उपाध्यक्ष श्री महावीर चौगुले, डॉ. जयकुमार चोपडे,श्री विजय पाटील, श्री राजन कुलकर्णी, श्री सुनील परीट, एक के नाना,डी आर कदम, सहेली अध्यक्षा सौ स्मिता वाळवेकर , सीमा शेटे, अश्विनी मगदूम, दिपा खोत, मेघा चौगुले, अस्लेशा चौगुले,सविता चौगुले,उज्वला परीट, अमृता चौगुले व इतर सहेली मेंबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या शिबिराचा 302 ग्रामस्थांनी लाभ घेतला. हे शिबिराचे आयोजन केल्याने ग्रामस्थ  व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!