भिलवडी परिसरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात
व्यापारी संघटना भिलवडी कडून गुणीजनांचा सत्कार : उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती
भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे विवीध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भिलवडी पोलिस ठाणे येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत भिलवडी येथे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. भिलवडी सेकंडरी स्कूल भिलवडी, प्राथमिक शाळा भिलवडी आणि परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माळवाडी येथील सन्मान करिअर संकुल (आदर्श विद्यालय) येथे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर, युवा नेते ऋषी भैय्या टकले, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
व्यापारी संघटना भिलवडी कडून गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दिलावर डांगे, चव्हाण यांचा समावेश होता.
यावेळी चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश वाळवेकर, उपाध्यक्ष रणजित पाटील, संस्थापक रमेश पाटील, जावेद तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.