राज्यस्तरीय खरिप हंगामपूर्व बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरिप हंगामपूर्व बैठक पार पडली.

यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री विश्वजित कदम, कृषिमंत्री दादाजी भुसे आणि इतर मंत्री उपस्थित होते.


कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

धोक्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कृषीक्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल. कोरोनाचे संकट लक्षात घेता अन्नधान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जगाची भूक भागवावी असे आवाहन त्यांनी केले.

पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

खरीप हंगामासाठी पालकमंत्र्यांकडून आलेल्या सूचनांची दखल घेत उपाययोजना करण्याचे निर्देश कृषी व सहकार विभागाला दिले. राज्य सरकारला ६ महिने पूर्ण होत आहेत. मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडला आणि कोरोनाचा वेढा पडल्यामुळे राज्यासह देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना नंतर जग बदलणार आहे, अर्थातच त्यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार पिकं घेऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात कशी होईल हेही पहिले पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी राज्यात बियाणे, खतांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे. पीक विमा योजनेबाबत केंद्र शासनाबरोबर चर्चा सुरू असून कोरोनामुळे शेती बरोबरच अन्य कुठल्या क्षेत्रात आव्हाने आहेत यावर चर्चा करण्यासाठी सविस्तर बैठक लवकर घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये