महाराष्ट्र

मानवी शरीराला व्यसनापासून दूर ठेवा : डॉ.शिवाजीराव भोई यांचे प्रतिपादन

 

कोल्हापूरःअनिल पाटील

निसर्गाने निर्माण केलेली अद्भुत निर्मिती म्हणजे मानवी शरीर होय. त्याची काळजी घ्या, संगोपन करा व त्याला व्यसनापासून दूर ठेवा. म्हणजे उर्वरीत आयुष्य सुखकर व आनंददायी होईल असे प्रतिपादन डॉ. शिवाजीराव भोई यांनी केले.
जीवबानाना ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, जाधव पार्क कोल्हापूर आयोजित घटस्थापनेच्या पूर्व संधेला ज्येष्ठांची बैठक व महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एन.एस. पाटील होते.
यावेळी प्रा.डी.एस. पाटील सेवानिवृत्त पी.एस.आय.आण्णाप्पा कांबळे, मानसिंग जगताप उपस्थित होते. होते.
भुई पुढे म्हणाले
ज्येष्ठानी आपली शारीरिक ,मानसिक ,सामाजिक आध्यात्मिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवावी यासाठी आहार ,विहार, व्यायाम विश्राम
याचे सातत्य ठेवावे.सकस आहार ,शुद्ध पाणी व स्वच्छ हवेत शक्य होईल तेवढे चालावे,फिरावे.म्हणजे म्हातारपण हे समाधानात जाते.
या वेळी आयोजित केलेल्या हळदी कुंकू या समारंभात प्रा. दीप्ती चौगुले यांनी हळदीकुंकू समारंभ घेण्या पाठीमागे उद्देश विविध क्षेत्रातील स्त्रियांची कर्तबदारी व समाजातील स्थान विशद केले. यावेळी संघाचे अध्यक्ष एन.एस.पाटील,यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, स्वागत रमेश पाटील यांनी केले.


कार्यक्रमास शांताराम (बापू )पाटील,एम.डी.पाटील,मानसिंग जगताप ,ए.डी.कांबळे,गौतम कांबळे, एस.डी. माने, सौ नंदा पाटील, रेखा पाटील,सुवर्णा पाटील, स्वप्नाली कुईगडे , स्मिता पाटील, आशा नरळे ,शारदा कांबळे,सुवर्णा कांबळे,सुरेखा पाटील, स्वाती कांबळे, ललिता पाटील, स्नेहल पाटील आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार एस.डी.कांबळे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!