महाराष्ट्र

सांगली येथे उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशन सांगली, अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड च्या वतीने इंजिनिअरिंग कॉलेज बुधगावचे प्रा सर्जेराव नरवडे यांचा सत्कार

प्रा सर्जेराव नरवडे यांनी नुकतेच एमबीए परीक्षेत 70 टक्के गुण मिळवून यश संपादन

सांगली:- सांगली जिल्हा जत तालुक्यातील गुगवाड येथील धम्मभूमीचे शिल्पकार निर्माते, सी आर एस ग्रुपचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले सी आर सांगलीकर फाउंडेशन सांगली व अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड च्या वतीने
वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज बुधगावचे प्रा सर्जेराव नरवडे यांचा सत्कार करण्यात आला.प्रा सर्जेराव नरवडे यांनी नुकतीच एमबीए परीक्षेत 70 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.  त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

नेहमीच उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा आदरातिथ्य सन्मान क‌रतात. यामागे इतरांनी गुणी लोकांचा आदर घ्यावा, आपल्या बरोबर आपल्या समाजाची उंची वाढवावी, हा हेतू आणि आग्रह उद्योगपती आर सांगलीकर साहेब यांचा असतो. त्यांच्या पश्चात ही सी आर सांगलीकर फौंडेशनच्या वतीने यशस्वी लोकांचा सन्मान करण्यात येतो.

या सत्कार प्रसंगी सी आर  सांगलीकर साहेब यांचे समर्थक प्रा संजीव साबळे ,प्रा अरुण कांबळे , भारत कदम, कुपवाड चे आनंदराव कांबळे व सी आर सांगलीकर फाउंडेशनचे अविनाश जाधव उपस्थित होते.
उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांच्या सामाजिक कार्याने व धम्माच्या विचाराने आपण प्रेरित झालो असून इथून पुढच्या काळात सांगलीकर यांच्या .. मार्गदर्शनाखाली धम्माच्या कार्यात अग्रेसर राहू, अशी ग्वाही प्रा सर्जेराव नरवडे यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!