केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली :- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शुक्रवार, दि. 14 जुलै 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 14 जुलै रोजी सकाळी 10.15 वाजता राशिवडे ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथून जत जि. सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह जत येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता जत येथे रस्ता व सभागृहाचे कोनशिला अनावरण. दुपारी 1.30 वाजता वकील, डॉक्टर आणि व्यावसायिक व्यक्तींसोबत श्रेया सभागृह जत येथे बैठक. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह जत येथे राखीव. दुपारी 2.30 वाजता मिरज येथील डॉक्टर हरीगल, व्यसनमुक्ती रुग्णालयाला भेट. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता दिवंगत वसंतदादा पाटील, कलादालन, स्टेशन रोड, जुने रेल्वे स्टेशन, सांगली येथे छायाचित्र प्रदर्शनाला भेट. सायंकाळी 6.30 वाजता आंबेडकर नगर, कमान, सांगली येथे श्री. चंद्रकांत कांबळे यांच्या हाऊस वार्मिंग समारंभास आणि कार्यालयाच्या उद्घाटनास उपस्थिती. शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. रात्री 1010 वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रयाण.