

दर्पण न्यूज भिलवडी दि १५ ऑगस्ट :– सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी च्या वतीने 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन संपन्न करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीने सन 225-26 या शैक्षणिक वर्षांमध्येप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस स्पर्धा परीक्षा एलिमेंटरी ग्रेड ड्रॉईंग परीक्षा या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या यशा निमित्त त्यांचा भिलवडी ग्रामपंचायत प्रागंणात सत्कार करण्यात आला त्यावेळी वरील उद्गार प्रमुख पाहुणे विश्वास चितळे यांनी काढले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे उपाध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी हे होते या कार्यक्रमास माननीय विश्वास चितळे डॉक्टर बाळासाहेब चोपडे अशोक चौगुले गिरीश चितळे महावीर वाठारे संभाजी सूर्यवंशी डॉक्टर रवींद्र वाळवेकर चंद्रकांत भाऊ पाटील अजय चौगुले पत्रकार शशिकांत राजवंत पत्रकार पंकज गाडे पत्रकार रोहित रोकडे पत्रकार घनश्याम मोरे , पत्रकार अभिजीत रांजणे,जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील दीपक पाटील महावीर चौगुले सुबोध वाळवेकर माळवाडीच्या माजी सरपंच सुरेश तांबोळी माळवाडीच्या विद्यमान सरपंच अश्विनी साळुंखे भिलवडीच्या सरपंच सौ स्वप्नाली रांजणे भिलवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवा बाबासाहेब चित्रे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश शिंदे सर्व विभागाचे सर्व मुख्याध्यापक विभागप्रमुख उपस्थित होते .तसेच भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीचे सर्व संचालक विश्वस्त सचिव सर्व विभागाचे विभाग प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणाले की एकाच संस्थेतील वेगवेगळ्या वर्गातील एकूण 43 विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये घवघवीत यश मिळणे ही अभिमानाची बाब आहे .प्रत्येक विद्यार्थ्याने सध्याच्या या धक्काधक्कीच्या जीवनातून आपल्यास काय हवे आहे याचा शोध स्वतःने घेतला पाहिजे यासाठी वेगळ्या प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे .शोधाल तर सापडेल या उक्तीप्रमाणे स्वतः आपण शोधले पाहिजे मार्गदर्शक मार्गदर्शनाची भूमिका करतात त्यांच्यावरती जास्त विसंबून न राहता आपण आपले यश मिळवण्यासाठी शोध घेतला पाहिजे यासाठी एकमेव स्पर्धा परीक्षा हा पर्याय आहे असे ते म्हणाले
सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील पाचवी ते दहावी मधील एकूण 38 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवले तसेच प्राथमिक खाजगी मराठी शाळा इंग्लिश मीडियम स्कूल या विभागातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांचा सन्मान चिन्ह देऊन तर जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांनी पेन तर मोहन नाना तावदर यांच्यावतीने वह्या देवून त्यांचा गुणगौरव केला .
याप्रसंगी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक या मा. मानसिंग हाके यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे सर यांनी मानले .या कार्यक्रमास सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी ,खाजगी प्राथमिक शाळा भिलवडी ,इंग्लिश मीडियम स्कूल भिलवडी ,बाबासाहेब चितळे महाविद्यालय ,भिलवडी .प्रकाश गोसावी बालवाडी .खाजगी इंग्रजी प्रायमरी स्कूल भिलवडी या विभागातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
