दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):-विटा पारे रोडवरील बजरंगनगर येथील घरफोडी उघडकीस; विटा प्रतिनिधी, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीत विटा पारे रोडवरील ( बजरंगनगर) येथील भाजीपाला व्यवसाय करणारे दयानंद चव्हाण यांचे घर (बजरंग नगर) पारे रोड येथे आहे, दयानंद चव्हाण हे शुक्रवारी सकाळी आपल्या कुटुंबासह भांबर्डे येथे शेतात कामानिमित्त गेले होते शेतात जात असताना त्यांनी आपलं घर बंद करून गेले होते. यावेळी हेच बंद घर शुक्रवारी भर दिवसा काही अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने घरामध्ये प्रवेश करून बंद घर फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व लोखंडी शटर चे कुलूप तोडले कडी कोयडा कटवणीने उचकटून घरातील १ लाख २५ हजार रुपय किमतीचे २५ ग्रॅम चे सोन्याचे गंठण, ३ लाख ७० हजारांचे सोन्याचे गंठण, १ लाख ७५ हजारांचा सोन्याचा हार १६ हजारांचे कानातील सोन्याचे टॉप्स, १ लाखाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या,४० हजारांचे सोन्याचे दोन फुलाचे वेल, ५ लाख २० हजारांची सोन्याची चैन, १० हजारांची पैंजण जोडी,१० हजारांची चार नग जोडवी, पंचवीस हजारांची चांदीची मोड,असे सुमारे १३,९१ लाखांचा मुद्देमाल सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते, सदर चव्हाण कुटुंब शेतातून घरी आल्यानंतर त्यांच्या घरात हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले, सदर चव्हाण कुटुंबाने व त्यांच्यातले सदस्य दयानंद चव्हाण राहणार विटा बजरंग नगर यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली सदर या चोरीची फिर्याद दाखल केली, सदर चव्हाण कुटुंबांनी संशयित म्हणून लक्ष्मण अण्णा चौगुले ( वय वर्षे २९, राहणार पारे रोड विटा ) याच्याविरुद्ध दयानंद चव्हाण राहणार बजरंग नगर विटा यांनी फिर्याद दिली, सदर विटा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली की ही चोरी घरफोडी लक्ष्मण चौगुले यांनीच केली आहे. या आधारे विटा उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्री फिरवत सदर लक्ष्मण चौगुले यांच्या घराची झडती घेतल्यानंतर सदर हे सर्व दागिने विटा पोलीस ठाणे पोलीस पथकाला मिळवून आली, सदर सर्व दागिने विटा पोलिसांनी जप्त करत या चोरी प्रकरणी घरफोडी प्रकरणी विटा पोलीसांनी लक्ष्मण अण्णा चौगुले यांना ताब्यात घेतले आहे.या घरफोडीचा तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कणसे करित आहेत,

