दर्पण न्यूज दुधोंडी : दुधोंडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व RPI नेते विशालभाऊ तिरमारे यांचे चुलते, कालकथित मा. अजित (भैय्या) तिरमारे यांच्या १८व्या स्मृतिदिनानिमित्त दुधोंडी जिल्हा परिषद मराठी शाळे मधील सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.हा उपक्रम इंजी. निलेश अजित तिरमारे व मा. विशाल (भाऊ) तिरमारे, संस्थापक / अध्यक्ष, भिमशक्ती सोशल फाउंडेशन, दुधोंडी यांचेवतीने आयोजित करण्यात आला.
कालकथित अजित (भैय्या) तिरमारे यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.असे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आयोजकांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षकांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमास दुधोंडी ग्रामपंचायत सदस्य राजेश तिरमारे, माजी सदस्य जगदीश तिरमारे, दुधोंडी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर तिरमारे,इंजी. अनिल तिरमारे, सागर तिरमारे, वैभव तिरमारे, अजिंक्य तिरमारे, अक्षय तिरमारे, सुमित तिरमारे, रोहित तिरमारे, कुणाल तिरमारे, आदित्य तिरमारे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
