महाराष्ट्र
महाराष्ट्र क्रांती सेनेच्या करवीर तालुकाध्यक्षपदी मारुती जांभळे यांची निवङ

कोल्हापूरःअनिल पाटील
*बालिंगा. ता. करवीर. येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती शंकर जांभळे यांची महाराष्ट्र क्रांती सेना करवीर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र क्रांती सेनेचे राज्याध्यक्ष सुरेशदादा लक्ष्मण पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख भरत पाटील यांनी दिले. मराठा आरक्षण आंदोलन, मराठा समाजाच्या विविध मागण्या, कल्याणासाठी जांभळे नेहमीच आघाडीवर असतात. करवीर तालुका सकल मराठा समाजाचे ते समन्वयक आहेत. यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र क्रांती सेनेच्या करवीर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने त्यांच्या कार्याचे कौतुक होतं आहे.