महाराष्ट्रकृषी व व्यापार

अमूलच्या विरोधात राज्यातील दूध संघांनी एकत्र येण्याची गरज : गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळेंची दुग्धविकासमंत्र्यांच्या सोबत चर्चा

 

 

कोल्हापूरःअनिल पाटील

महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री नाम. राधाकृष्ण विखे-पाटील यांची अहमदनगर येथे कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे नूतन चेअरमन अरुणकूमार डोंगळे यांनी नूकतीच भेट घेतली.


अमूलचे आव्हान परतावून लावण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघानी एकत्र येण्याची गरज आहे. कर्नाटक व तामिळनाडू(स्‍टॅलिन सरकार) सरकारने अमूलच्या विरोधात जशी भूमिका घेतली त्याच प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी महानंदाने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने त्याला खंबीर साथ द्यावी.”या विषयावर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) चेअरमन अरुणकूमार डोंगळे यांनी राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत चर्चा केली.

दगोकुळचे नूतन चेअरमन डोंगळे यांनी राज्याचे दुग्धविकासमंत्री विखे -पाटील यांची भेट घेतली. या भेटीत दुग्ध व्यवसायासंबंधी चर्चा झाली. दुधाचे उत्पादन वाढ, दुधाची गुणवत्ता यापासून ते मार्केटिंगपर्यंत अशा वेगवेगळ्या विषयावर मंत्र्यांच्यासोबत चेअरमन अरूणकूमार डोंगळे यांनी चर्चा केली. अहमदनगर येथे ही भेट झाली. याप्रसंगी चेअरमन डोंगळे यांनी मंत्री विखे पाटील यांना पुष्पगुच्छ देत गोकुळ परिवारातर्फे सत्कार केला. यावेळी डोंगळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मंत्री विखे – पाटील यांनी, ” या विषयासंबंधी महानंदांचे चेअरमन यांच्यासोबत चर्चा करू. लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाईल.”अशी ग्वाही दिली.
यावेळी पी.टी. शिंदे, अजित पाचुंदकर आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!