दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार ) -: सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे माजी आमदार ॲड सदाशिवराव (भाऊ) पाटील यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कायमच आपले कर्तव्यदक्ष कामगिरी करत आजही माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील हे विटा शहरासह खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल मध्ये मतदार व नागरिकांशी संवाद साधत विचार पूस करत अनेक समस्या मार्गी लावताना दिसून येत आहे, तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी सुद्धा संपर्क करत त्यांची विचारपूस करताना दिसून येत आहेत, याच वेळी मागील दिड महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यात जिल्हा अधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष कामगिरी करणारे सांगली जिल्हा अधिकारी मा.श्री. मैनाक घोष ( साहेब) यांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माजी आमदार ॲड श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांनी भेट घेतली,या भेटीत बराच वेळ गप्पा मारून माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील यांनी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली, या वेळी विकासा कामा संदर्भात विविध मुद्द्यावर विचारांची देवाण-घेवाण करत, लोकहिताच्या कामाबाबत संवाद साधला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला, यावेळी माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील यांनी सांगली जिल्हा अधिकारी मा.श्री , मैनांक घोष साहेब यांना मनपूर्वक आभार व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या,
या वेळी माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील यांनी सांगली जिल्हा अधिकारी श्री मैनांक घोष यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला,तर या वेळी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या सोबत होते.