

दर्पण न्यूज पलूस भिलवडी (अभिजीत रांजणे):- सांगली जिल्हा पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पलूस येथे आयोजित करण्यात आला होता. या विशेष गौरव सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पलूस तालुक्यातील १२ प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. प्रताप (नाना) पाटील, वक्ते सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विशाल माने, उद्योजक सर्जेराव (आण्णा) नलवडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी, स्व. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या सौ. पुष्पावती मिठारी, सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सुनील भोसले, पुढारी महाआयकॉन’ पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख तसेच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्जेराव (आण्णा) नलवडे यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकास, कृषी, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास या विषयांवर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख, डॉ. प्रताप (नाना) पाटील, रामानंद पाटील व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त
के ले. अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब डांगे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा गौरव करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विशाल माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध समाजोपयोगी योजना, शासनाचे उपक्रम, पायाभूत सुविधांचा विस्तार, कायद्यातील सुधारणा, नोटबंदी तसेच देशाच्या विकासाच्या दिशेबाबत सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रदीप आप्पा
कदम यांनी केले . महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या विविध योजना समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचाव्यात आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान व्हावा, हीच भावना आहे असे सांगितले.
यावेळी बांबवडेचे सरपंच अरविंद मदने, पोपटराव संकपाळ, सागर भाऊ कांबळे, नगरसेवक अमृत माळी, सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव, पत्रकार, यांच्यासह परिसरातील नागरिक, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले. आभार अभिजीत सावंत यांनी मानले.