दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे ) :-
घरची परिस्थिती प्रतिकूल असून त्या परिस्थितीवर मात करत कोणत्याही मार्गदर्शना विना पवन महेश खानापुरे यांनी NIPER Guwahati येथून M.TECH.Biotechnology पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण केले. त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी धाराशिव तालुकाध्यक्ष रविराज (भैय्या) घाडगे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कळंब तुषार (भैय्या) सावंत, साईराज एंटरप्राइजेस येडशी चे सर्वेसर्वा मा. तानाजी जाधव साहेब, येडशी गावचे उपसरपंच मा.सुनील (भैय्या) शेळके, येडशी गावचे माजी उपसरपंच मा. गजानन (भैय्या) नलावडे, समीर पटेल व इतर मित्रपरिवार उपस्थित होते.