दर्पण न्यूज सांगली प्रतिनिधी -: वयोवृद्ध जेष्टांचे व महिलांचे रक्षण करून त्यांच्या केसाला धक्का लागून न देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा, सांगलीतल्या हौसाई वृद्धाश्रमात वृद्धांना आधार देऊन मोफत सेवा म्हणजेच ईश्वर सेवा होत आहे असे मत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले
ते केंद्र सरकारच्या समाज कल्याण मंत्रालयआणि खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त समारंभात बोलत होते, यावेळी छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगली महापालिकेचे नगरसेवक विश्वजित पाटील, संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, संस्थेच्या सचिव रश्मीताई भंडारे, वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते.
हौसाई वृद्धाश्रम सांगली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर दादा गाडगीळ पुढे म्हणाले, शिवरायांनी आपल्या राज्यात वृद्ध व्यक्तींचा सन्मान राखण्यावर भर दिला. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा उपयोग प्रशासन व समाजकारणात केला जात असे. वृद्धांना आदराने वागवणे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि त्यांना मानाचे स्थान देणे ही शिवकालीन संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. राजमाता जिजाऊंच्या स्वप्नातले स्वराज्य आणि सामाजिक समता व न्यायाचे आणि समभावाचे राज्य आणायचे असेल तर प्रत्येकाला शिवबा व्हावे लागेल, देशाला महासत्ता बनवायला युवकांनी कंबर कसली पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना तळागाळात राबवून सामाजिक विकास साधल्यास प्रत्येक जन सक्षम बनेल.
या प्रसंगी स्वागत प्रास्ताविक चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी केले. तर सूत्रसंचालन ऋतुजा कांबळे यांनी केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, महापालिकेचे नगरसेवक विश्वजित पाटील, दिगंबर कदम रोहित करगणे, तथास्तु कल्चरल अकादमीच्या विभाग प्रमुख चैताली तातूगडे आदींची भाषणे झाली.
यावेळी उपाध्यक्ष जयवंत माळी, तथास्तु कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, संचालक नजीर मुजावर, शाबाद म्हेतर, ऍड.शिवाजी कांबळे, धनराज जाधव, प्रशांत सावंत, फर्जाना मुजावर, हरिराम खबाले, रेखा शेंडे, चंदन बनसोडे, संदीप कोरे, सोनिका कांबळे, राहुल ऐवळे, विकास भंडारे,अमित मुळीक यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी, सभासद कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मानले.