दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-: निसर्ग फाउंडेशन संस्थेच्यावतीने भारती विद्यापीठ, पुणे संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, घोटी बुद्रुक येथील नूतन मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या श्री. शालिवान भालचंद्र लोखंडे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
संस्थेचे कार्यवाह सिव्हिल सर्जन डॉ. विक्रमसिंह कदम, सहकार्यवाह फिरोज शेख,सल्लागार प्रा. संजय ठिगळे, उपाध्यक्षा डॉ. वैशाली हजारे, सचिव नानासाहेब मंडलिक यांच्यावतीने या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नितीन चंदनशिवे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्याध्यापक शालिवान लोखंडे यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात मुख्याध्यापक शालिवान लोखंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. शाळेचा शैक्षणिक व सांस्कृतिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.
यावेळी निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. नितीन चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शिक्षण क्षेत्रात सक्षम व दूरदृष्टी असलेले नेतृत्व मिळणे ही शाळेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. श्री. शालिवान लोखंडे सर यांच्या अनुभव व कार्यक्षमतेमुळे शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यासाठी आवश्यक मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास निसर्ग फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन चंदनशिवे, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले, सुरज मंडले, अभि गायगवळे, बुद्धिवान आंबवडे, भगवान जाधव, जीवन धेंडे, प्रतिक्षा जाधव,विद्यालयातील शिक्षक प्रदिप मुळीक, सुरज राऊत, मेहतर सर,शेख मॅडम, कोमल जाधव, शब्बीर पटेल, ए. बी.पाटील, अन्य शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.