दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार)-: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता विटा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छतेमध्ये जनजागृती केली जात आहे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विटा नगरपरिषद व शहरातील स्वच्छतादूत नागरिक अहोरात्र प्रयत्न करत आहेत
खानापूरपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभैय्या बाबर, नगराध्यक्षा,सौ.काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्रभैय्या कांबळे व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्वच्छतेमधील गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे दैनंदिन साफसफाई गटार स्वच्छता कचरा संकलन कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती तसेच सार्वजनिक शौचालय अद्यावत केलेली आहेत शहरांमध्ये 100% प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे
नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने सर्वसोई नियुक्त सार्वजनिक शौचालय शहरातील विविध ठिकाणी उभारलेली आहेत. त्याचे व्यवस्थापन दैनंदिन केले जाते परंतु काही अज्ञात व्यक्ती शहरातील बिसूरकर गल्ली, मारुती मंदिर, मॉडर्न शाळेजवळील सार्वजनिक शौचालय, चांभार वेस येथील शौचालय, बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सार्वजनिक शौचालय इत्यादी शौचालय मध्ये असलेल्या साहित्याची जाणीवपूर्वक मोडतोड करत आहेत हे सातत्याने निदर्शनास येत आहे
नुकतेच बिसूरकर गल्ली येथील सार्वजनिक शौचालयातील साहित्याची मोडतोड केलेली आहे यावर कडक कारवाई म्हणून विटा नगर परिषदेने अज्ञात व्यक्तीवर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे
यावेळी बोलताना मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील म्हणाले की शहरातील सार्वजनिक शौचालयाची मोडतोड करणाऱ्यांवर व मालमत्तेचे नुकसान केल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना आवाहन आहे की असे मोडतोड करताना आपल्या निदर्शनास आल्यास आपण तात्काळ माहिती द्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे
शहर स्वच्छतेमध्ये नागरिकांच्या तक्रारी सूचना व समस्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी स्वच्छ शहर अंमलबजावणी कक्ष सक्रियपणे कार्यरत आहे शहर स्वच्छतेसाठी आपणही सहकार्य करून शहर स्वच्छतेमध्ये योगदान द्यावे असे प्रतिपादन केले
यावेळी नगरसेवक संजय भिंगारदेवे, प्रभारी आरोग्य निरीक्षक संदीप वाघमारे, अर्जुन सूर्यवंशी श्रीकांत साठे मुकादम दिपक सातपुते, सुचिता कांबळे, नितीन चंदनशिवे अन्य उपस्थित होते.