

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी -:भारती विद्यापीठ पुणे संचलित, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक येथे मंगरूळ केंद्रातील शैक्षणिक वर्ष 2026-2027 मधील प्रथम शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
मंगरुळ केंद्राचे सहाय्यक केंद्रप्रमुख मा. श्री.कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ मुख्याध्यापक श्री.कोरे सर, यशवंतराव चव्हाण माध्य. विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक मा.श्री.लोखंडे एस. बी.सौ.राजे मॅडम, मुख्याध्यापक माणिक सकटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, व सरस्वती पूजन तसेच भारती विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिक्षण परिषद कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी मंगरूळ केंद्राच्यावतीने नूतन मुख्याध्यापक शालिवान लोखंडे यांचा सत्कार जेष्ठ मुख्याध्यापक श्याम माने यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विषय तासिकेनुसार शिक्षण परिषद चे कामकाज अत्यंत उत्कृष्टपणे संपन्न झाले.
या शिक्षण परिषदेस जि.प.शाळा घोटी बु।।, जि.प.शाळा चिंचणी (मंगरूळ) जि.प. शाळा कुर्ली, जि. प. शाळा कार्वे, जि.प. शाळा बामणी, रयत शिक्षण संस्थेचे पारे हायस्कूल, जि.प.शाळा मंगरुळ, जि.प.शाळा,नवे कार्वे, जि.प. शाळा घाडगेवाडी, जि.प.शाळा-कांचनपुर, जि.प. शाळा पारे, चिंचर्णी हायस्कूल इ. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, कर्मचारी व सेवक वर्ग यांनी विशेष योगदान दिले.