‘
दर्पण न्यूज पलूस भिलवडी (अभिजीत रांजणे):-नेहमीच आपल्या हसऱ्या शैलीने अनेक दिव्यांगांना साथ देणारा दिव्यांग संजय चौगुले यांनी भिलवडी आणि परिसरात’पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत लोकांनी मोठा सहभाग घ्यावा , लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून या, असे संबोधणारे बॅनर घेऊन आपल्या तीन चाकी सायकल द्वारे जनजागृती केली.
दिव्यांग संजय चौगुले यांनी भिलवडी आणि परिसरातील दिव्यांग बांधवांना अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे ,याचबरोबर दिव्यांग बांधवांना शासनाची पेन्शन मिळवून देणे, अनेक दाखले देणे, यासाठीही संजय चौगुलेंचा प्रयत्न असतो.
रविवार दिनांक 28 रोजी च्या भारत सरकारने ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवित ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लस देऊन बालकांचे भविष्य सुरक्षित करूया आणि पोलिओमुक्त भारताचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी मोठा प्रयत्न केला. या ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत भिलवडी येथील दिव्यांग संजय चौगुले यांनीही स्वतः तीन चाकी सायकल द्वारे प्रत्यक्ष चौकामध्ये जाऊन जनजागृती केली. आपल्या तीन चाकी सायकलच्या मागे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमे संदर्भात बॅनर तयार केला होता. या बॅनर मध्ये बऱ्याच गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता .संजय चौगुले स्वतः दिव्यांग असल्याने आपल्यासारख्या अडचणी कोणाला येऊ नये म्हणून त्यांनी नेहमीच आणि सातत्याने कार्य केले आहे.
दिव्यांग संजय चौगुले यांच्या पल्स पोलिओ लसीकरण जनजागृती मोहिमेसाठी अनेकांनी सहकार्य केले. यामध्ये भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अविनाश पाटील, डॉ. आदिनाथ पिसे, सिस्टर शीला लादे , भंडारे, मुळे, कर्मचारी वर्ग, आशा सेविका आणि इतरांचेही सहकार्य लाभले.
संजय चौगुले यांनी नक्कीच सुदृढ माणसाला लाजवेल अशी कामगिरी केली आहे. आम्हाला आशा आहे की, अशा दिव्यांग बांधवांची आपणही सेवा करून संजय चौगुले यांचा आदर्श चिरकाल ठेवूया.