दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-:सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात मध्यवर्ती चौकात झालेल्या हाणामारीत जुना किरकोळवादाचा राग मनात धरून चौघांनी शिवीगाळ, स्टिक, व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात रोहन सुभाष गायकवाड ( वय वर्षे १९रा.छत्रपती शिवाजीनगर, विटा ) . या तरुणाने विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, या फिर्यादीत असे म्हटले आहे की. धीरज सतीश चव्हाण,( वय वर्षे २३, राहणार मायणी जिल्हा सातारा,) हर्षद बुधावले ( वय वर्षे २१. रहाणार विटा ,ता.खानापूर. जिल्हा सांगली,). धीरज सुरेश चव्हाण, ( वय वर्षे २८,राहणार विटा, जिल्हा सांगली,). आशीष बुधावले ( वय वर्षे २४ ,राहणार विटा , जिल्हा सांगली,) रोहन गायकवाड या तरुणास मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. ही मारहाण दुपारी चारच्या सुमारास कृष्णलीला मंगल कार्यालया मागे कराड रोड नवा भाळवणी मार्ग रस्ता विटा येथे झाल्याचे विटा पोलिसांनी दैनिक प्रीतीसंगम शी बोलताना सांगितले, रोहन गायकवाड हा त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत बसला असता जुन्या किरकोळवादाचा राग मनात धरून धीरज चव्हाण याने गायकवाडच्या पाठीवर व हातावर मारहाण केली हर्षद बुधावले आणि स्टिकने हात व पायावर मारहाण केले असे विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,