दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर येथे सालाबाद प्रमाणे या वर्षीही मोहरम निमित्त खानापूर येथे दर्गा परिसरात धार्मिक विधीप्रमाणे सर्व कार्यक्रम जे पार पडतात त्या कार्यक्रमास खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे व विटा शहराचे तरुण तडफदार युवा नेतृत्व तसेच विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री पृथ्वीराज बाबा पाटील यांनी खानापूर येथे मोहरम निमित्त पंजाचे दर्शन घेऊन, तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या, तसेच खानापूर येथील मोहरम ही परंपरा हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतिक म्हणून ओळखले जाते, या मोहरम निमित्त महाराष्ट्रातील अनेक गलाई बांधव, बाहेर असलेले व्यापारी वर्ग कुटुंब आपल्या गावी खानापूर येथे येत असतात तसेच बोललेले नवस सालोन साल हे मोहरम दिवशी सोडवले जाते, तसेच विविध खेळ सोंगी आयोजन केले जाते, तसेच दर्गा परिसरामध्ये कुस्तीचे मैदान भरवले जाते कुस्तीप्रेमींचा उत्साह या ठिकाणी अनुभवायला मिळतो, यानिमित्ताने गावातील नागरिक तसेच सर्व मल्ला पैलवान आणि उपस्थित मान्यवरांचे संवाद साधण्याचा एक वेगळाच आनंद या दर्गा परिसरामध्ये तसेच गावात भेटीगाठी दरम्यान होत असतो, त्यामुळे सामाजिक सलोखा व परंपरा आणि क्रीडा संस्कृती जपणारा हा उत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे म्हणत मोहरम निमित्त युवा नेते माजी नगरसेवक पृथ्वीराज बाबा पाटील, यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा देत पैलवान मल्ला यांची भेट घेतली,