अवैध मद्य विरोधी कारवाई.”
स्थानिक गुन्हे शाखा:
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
स्थानिक गुन्हे शाखा: आरोपी नामे-कविता संजय काळे, वय 35 वर्षे, रा.पारधीपिढी भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.27.06.2026 रोजी 13.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 4,500 ₹ किंमतीची 45 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- विलास शामराव मडके, वय 70 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.27.06.2026 रोजी 13.50 वा. सु. मोहा ते येडशी रोड लगत मोहा येथे अंदाजे 9,000 ₹ किंमतीची 90 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- प्रदीप लक्ष्मण गोरे, वय 24 वर्षे, रा.झेंडेवाडी ता.भुम जि. धाराशिव हे दि.27.06.2026 रोजी 14.15 वा. सु. हॉटेल जगदंब ईट येथे अंदाजे 2,400 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये संबंधीत पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.