दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-:
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नगरपरिषद विटा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व सामाजिक क्षेत्रात कायमच अग्रेसर कामगिरी करणाऱ्या व सर्वाशी आपलकी जपत कर्तव्य दक्ष कामगिरी करणाऱ्या विटा सांगली रोड लागत असलेले नेहरु नगर येथील श्री.कै. विजय भिंगारदेवे ( उर्फ सर्वाचे लाडके मोहन भाऊ) यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले, त्यांच्या जाण्याने त्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, तसेच मित्र परिवार व विटा नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनाही दुःख झाले, एक चांगले व्यक्तिमत्व हरवले असे म्हणत विजय भिंगारदेवे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी व अन्य नातेवाईक आहेत.