‘



दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- भिलवडी ग्रामपंचायत येथे ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा’ शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य प्रतीक दादा पाटील यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
आपल्या परिसरातील ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लस देऊन बालकांचे भविष्य सुरक्षित करूया आणि पोलिओमुक्त भारताचा संकल्प अधिक दृढ करूया!
चला, एकही बालक डोसपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी घेऊया, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, वनीता पाटोळे, शोभा पाटील , माता पालक, मान्यवर उपस्थित होत्या. भिलवडी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला प्रतिसाद मिळाला.
भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी आणि परिसरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नेटकं नियोजन केले होते.