
दर्पण न्यूज पलूस / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळाला बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पलूस येथे रविवार, दि. २८ जून रोजी सायंकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन पुरस्कार प्राप्त केलेल्या तसेच अलिकडेच सन्मान जाहीर झालेल्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्याहस्ते सत्कारमूर्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उद्योजक सर्जेराव नलावडे, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुष्पावती मिठारी तसेच महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रगतशील शेतकरी सुनील भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.