दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) :-बालवाडीचे शिक्षण म्हणजे खरा मराठीशिक्षणाचा पाया आहे, असे मत विटा नगरपरिषद विटा शिक्षण समितीच सभापती डॉ. लीला भिंगारदेवे यांनी व्यक्त केले.
विटा येथील शाळा क्रमांक दोन मध्ये मुख्याध्यापक व बालवाडीच्या शिक्षिका यांच्या सभेमध्ये त्यांनी उदगार काढले काढले, समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना त्यांना संस्कार व बालवयामध्ये शिक्षण देत असताना त्यांच्यावर जे लहान वयात संस्कार होतील तेच महत्त्वाचे असते. लहान वयातच त्यांना दिलेले शिक्षण हे महत्त्वाचे असते अशा त्या म्हणाल्या तसेच शिक्षण प्रशासकीय अधिकारी विकास राजसाहेब असे म्हणाले की, शाळेमध्ये वेळेमध्ये सर्व बालवाडीच्या शिक्षकांनी येणे गरजेचे असून दिलेला जो सिल्याबस आहे त्या सिल्याबस प्रमाणे सर्वांनी काम करावे प्रामाणिक काम करावे तसेच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा असंच शिक्षण आपण दिले पाहिजे. शिक्षकांनी अध्यापनाचे काम चूक केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक शांतिनाथ पाटील यांनी केले. आभार सुरेश कोळी सर यांनी केले यावेळी विटा नगर परिषदेच्या सर्व शाळा मधील मुख्याध्यापक व सर्व बालवाडीच्या शिक्षिका उपस्थित होते.