
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार )-:: समाजातील प्रत्येक सामान्य माणसाला माणूसपण देणारे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज हे खरे समाज परिवर्तनाचे महामेरू आहेत. ते केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने दीन दलितांचे बहुजन वंचितांचे कैवारी होते. त्यांनी शिक्षण उद्योग शेती आणि सामाजिक समतेसाठी घेतलेले निर्णय आजही देशाला दिशा देणारे आहेत असे प्रतिपादन आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसईचे प्राचार्य अवधूत खरात यांनी केले. लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शेजल सुर्वे, अमिता पवार, अथर्व पुकळे, शरण्या गायकवाड, स्वरा पवार, यांनी आपल्या वक्तृत्वातून असे होते शाहू महाराज याविषयी विचार स्पष्ट केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर यांनी शाहू महाराजांचे जीवन व सामाजिक कार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. आजचा दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून सगळीकडे साजरा करण्यात येतो अशी माहिती देण्यात आली .
या जयंतीच्या कार्यक्रमासाठी कार्यकारी संचालक पी. टी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रशालेचे उपप्राचार्य निलेश भोसले, पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिधी शर्मा, श्रुती देवकर यांनी केले व आभार श्री विद्या कवडे हिने मानले.