
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर येथे सालाबाद प्रमाणे मोहरम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोहरम सणा निमित्त पारंपारिक सोंगांना सदिच्छा भेट देत सर्वधर्मसमभाव ऐक्याचे प्रतिक जपत खानापूर येथे ढोल सण म्हणजेच मोहरम सण साजरा केला जातो, नवसाला पाहणारे ढोले मोहरम म्हणून खानापूरला ओळखले जाते, शिवाय या दिवशी धार्मिक विधीप्रमाणे हिंदू मुस्लिम बांधव एक दिलाने हा कार्यक्रम पार पाडतात, तसेच धर्म संस्कृती आणि परंपराचा सन्मान करत समाजात बंधुता सलोखा आणि एकोप्याचा संदेश देणारे असे उत्सव आपल्या सामाजिक ऐक्याची खरी ओळख आहे, आहे असे म्हणत आमदार सुहास बाबर यांनी आपले विचार व्यक्त करत, तमाम सर्व हिंदू_ मुस्लिम बांधवांना मोहरम सणा निमित्ताने शुभेच्छा दिल्या, यावेळी आमदार सुहास बाबर यांचा सत्कार हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने व तमाम खानापूरकरांच्या वतीने या मोहरम सणानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल सत्कार करण्यात आला, तालुक्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना, सर्वधर्मसमभाव ऐक्याचे प्रतिक म्हणून असा सोहळा पहाताना समाधान वाटते, विटा येथेही तमाम सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मोहरमच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.