दर्पण न्यूज पलूस भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. वाचनालयाचे जेष्ठ संचालक श्री जयंत केळकर यांचे हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.
स्वागत प्रास्ताविक कार्यवाहक सुभाष कवडे यांनी केले यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष डी आर कदम ग्रंथपाल मयुरी नलवडे मुख्य लेखनिक विद्या निकम माधव काटीकर व नियमित वाचक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी जयंत केळकर यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले शाहू महाराजांनी समतेची चळवळ राबवली आरक्षणाचा पुरस्कार केला कलाप्रेमी म्हणून शाहू महाराज जगभर प्रसिद्धीस पावले आदर्श राजा म्हणून आजही शाहू महाराजांच्या कडे पाहिले जाते शेवटी सुभाष कवडे यांनी आभार मानले.