दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
: राज्याचे आरोग्यमंत्री शुक्रवार, दि. २६ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून राजर्षी शाहू जयंती, सामाजिक न्याय दिन तसेच विविध शासकीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता गारगोटी (ता. भुदरगड) येथील निवासस्थानातून होणार आहे. सकाळी ८ वाजता कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आयोजित राजर्षी छत्रपती शाहू जयंती २०२६ सोहळ्यास ते उपस्थित राहतील.
त्यानंतर सकाळी ८.३० वाजता दसरा चौक येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त समाजकल्याण विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित समता दिंडी कार्यक्रमात सहभाग घेतील. सकाळी ९.३० वाजता राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मारक भवनाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिक प्रशासन विभागाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला ईआर-एसयू (ER-SU) वाहन हस्तांतरण कार्यक्रम पार पडणार असून त्यालाही आरोग्यमंत्री उपस्थित राहतील.
सायंकाळी ६ वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनात राजर्षी शाहू पुरस्कार २०२६ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
दिवसभरातील कार्यक्रमांनंतर ते गारगोटी येथील निवासस्थानी परतणार असून त्यांचा मुक्काम तेथेच राहणार आहे.