दर्पण न्यूज धाराशिव (संतोष खुने) :- येडशी गाव पाणीपुरवठा योजने संदर्भात 7 मे रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले .या आंदोलन च्या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनी लेखी स्वरुपात दोन दिवसात त्वरित टँकर चालू करू व कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजने संदर्भात तातडीची बैठक आंदोलन करते ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी यांच्या समवेत घेऊ असे आश्वासन दिले होते. परंतु या कामासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे आंदोलन करते गजानन नलावडे यांनी पुन्हा स्मरणपत्र देऊन आंदोलन कर ण्याची तयारी दर्शवली होती म्हणून काल दिनांक 24/6/26 रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले परंतु या बैठकीमध्ये येडशी गावाला जर पाणी अर्जंट कुठले मिळू शकते तर तेरणा पाणीपुरवठा योजनेतून मिळू शकते असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगून सर्व माहिती घेतली होती या योजना चालू करण्यासाठी लाईट बिल ची पूर्तता करून कॉन्ट्रॅक्टरने लातूर रोड वरील पाईपलाईनचे पाईप काढलेले त्वरित टाकून घेण्याचे आदेश एमजीपीला देण्यात आले व गावातील टाक्या मध्ये टॅंकरने पाणी भरून पाईपलाईन चेक करण्याचे आदेश देखील ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहेत या ठिकाणी या बैठकीमध्ये तेलंगदरा पाईपलाईन दुरुस्ती संदर्भात चर्चा केली असता पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायत स्तरावर खर्च करता येऊ शकतो असे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे. तेलंगदरा व तेरणा यातून पाणी पुरवठा घेऊन त्वरित चालू करता येऊ शकतो लाईट बिलाची पूर्तता ग्रामपंचायत ला वित्त आयोगातून करता येऊ शकते अशी त्यांनी सांगितले आहे यानंतर कायमस्वरूपी पाणीपुरवठा चोराखळी योजनेतून निधी उपलब्ध झाला तर तेरणा पाईपलाईन योजनेतून बाहेर पडता येऊ शकते अशी देखील त्यांनी सुचवले आहे . चोराखळी पाणीपुरवठा प्रश्नसंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट आमदार कैलास दादा पाटील व गजानन नलावडे यांनी घेऊन सर्व माहिती दिली मंत्री महोदय यांनी तातडीची कार्यवाही ची सूचना केली पुढील कारवाई चालू आहे तसेच माननीय आमदार कैलास दादा पाटील यांना अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मांडण्याची विनंती देखील केली आहे पाणीपुरवठ्या संदर्भात लवकरात लवकर मार्ग नाही निघाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्याचे देखील यावेळी गजानन नलावडे यांनी सांगितले आहे. या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सरपंच सोनिया पवार माजी उपसरपंच गजानन नलावडे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार शिवसेना विभाग प्रमुख अशोकराव देशमुख गणेश पवार इत्यादी उपस्थित होते.