दर्पण न्यूज कोल्हापूर, अनिल पाटील
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राधानगरी तालुक्यात कल्याण मटका जुगारावर कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ६,८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव सदाशिव पाटील (वय ५०, रा. गुडाळ, ता. राधानगरी) हा आपल्या फायद्यासाठी गावातील पाण्याच्या टाकीजवळ उघड्यावर लोकांकडून कल्याण मटका जुगार खेळवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत रोख रक्कम, जुगाराच्या नोंदी असलेले चिठ्ठीपत्रक, बॉलपेन, भारतीय चलनी नोटा तसेच मोबाईल हँडसेट असा एकूण ६,८४1 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून जुगार व्यवसायाविरोधातील अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी सांगितले