


दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा लेंगरे रोडवर भांबर्डे टेक येथे विटा नगरपरिषद शिंदे शिवसेना गटाचे नगरसेवक रामचंद्र भिंगारदेवे यांच्या शेतात काल रात्री ८/४०च्या सुमारास काही नागरिकांना बिबट्या दिसल्याने त्या परिसरात नागरिकांतून भीतिदायक निर्माण झाली आहे, अक्षरशः बिबट्या दिसताच एकाने जोरात जोराने ओरडत सुटला तर त्यामुळे बिबट्याने तिथून शेताच्या बांधावर धुम ठोकली,शिवाय यांच याच रोडवर मागील काही महिन्यापूर्वी बोडरे वस्ती, तसेच कदम वस्ती, व खंडोबा मंदिर परिसरात, शिव मल्हार टेकडी, या परिसरात याच बिबट्याचा वावर होता, या वेळी या बिबट्याने बोडरे वस्ती येथे घराच्या बाहेर बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले होते, त्यामुळे पुन्हा त्याच परिसरात तेथून काही अंतरावर भांबर्डे एक शेताजवळ बिबट्याचे दर्शन झाले आहे, नगरसेवकाच्या शेतात बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली आहे, वन विभागाचे अधिकारी विलास पवळे यांनी घटनास्थळी टीम सह दाखल झाले, यावेळी आजूबाजूला सर्वत्र या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध घेतला मात्र बिबट्या कुठेही निदर्शनास आला नाही, खबरदारीचा इशारा देत , नागरिकांनी बिबट्यापासून आपले संरक्षण कसे करावे या संदर्भात वन विभागाधिकारी विलास पवळे यांनी सुचना जारी केल्या,तर घराबाहेर कोणीही झोपू नये तसेच आप रात्रीच्या वेळी एकटे घराबाहेर पडू नये, बिबट्या अचानक समोर दिसल्यास काय करावे या संदर्भात नागरिकांना सूचना दिल्या, तसेच त्या परिसरात बिबट्याचा वावर आहे याची खात्री करण्यासाठी वन विभाग अधिकारी यांची टीम सर्वत्र पाहणी करत असताना जवळच असणाऱ्या एका शेतात बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आले,तर काही ठिकाणी खबरदारी म्हणून आपण ही काळजी घ्यावी असेही नागरिक माता भगिनींना आवाहन केले, यावेळी नगरसेवक रामचंद्र भिंगारदेवे व त्यांची टीम यांनीही नागरिकांना आव्हान केले.