दर्पण न्यूज जामखेड प्रतिनिधी :- जामखेड – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार बापुसाहेब घोडेस्वार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.
जामखेड तालुक्यातील साकत गावचे भूमिपुत्र जामखेड तालुका स्तरावर दमदार युवा पत्रकार बापुसाहेब रावसाहेब घोडेस्वार यांना २०२६ चा “आदर्श पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण 5 जुलै रोजी अहिल्यानगर येथे वितरण होणार आहे.
गेल्या १३ वर्षांपासून बापुसाहेब घोडेस्वार यांनी सत्य, निर्भीड, निष्पक्ष पत्रकारिता जिल्हा स्तरीय, तालुका स्तरीय, गावागावातील तळागाळातील, शैक्षणिक, सामाजिक प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी बापुसाहेब घोडेस्वार यांनी पत्रकारितेचा वापर केला.याची दखल घेत महाराष्ट्र राज्य यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला. युवा पत्रकारने जामखेड तालुक्याची तसेच साकत गावची मान उंचावली आहे. बापुसाहेब घोडेस्वार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार “आदर्श पत्रकार” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा स्तर, तालुका स्तर, साकत पंचक्रोशीतुन तसेच विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहे.