दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
दिवंगत पोलीस पाटील श्री जयसिंग सरवदे रा. जि. धाराशिव हे कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांच्या गावातील कोरोना निर्मूलन दक्षता समितीमध्ये कार्य पार पाडत असताना. त्यांचा दिनांक.१०/०४/२०२१ रोजी कोरोना रोगाच्या साथीने मृत्यू झाला. कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कमवच म्हणून शासनाने सहानुग्रह अनुदान रुपये 50 लक्ष इतके देण्याचे शासन निर्णय जारी केले होते त्या अनुषंगाने रक्कम रुपये 50 लक्ष रुपयाचा धनादेश त्यांची वारसदार पत्नी सौ सरवदे यांना आज दि.23.06.2026 रोजी मा. पोलीस अधीक्षक. धाराशिव श्रीमती रितु खोखर मॅडम यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत धाराशिव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष. व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक. श्री सुनील बाबर साहेब हे उपस्थित होते.