दर्पण न्यूज मिरज / सांगली : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत अनुसूचित व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, बांबवडे (ता. पलूस) येथे सन 2026-27 करिता इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या शाळेत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापक तानाजी करचे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
निवासी शाळेच्या विद्यार्थिनींना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत मुलींना निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश, वॉशिंग मशीन, अद्ययावत जिम, क्रीडा साहित्य, शुध्द जल, इन्व्हर्टरची सोय अशा प्रकारच्या सुविधा मोफत आहेत. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता सुसज्ज अद्ययावत ई-लर्निंग सुविधेसह वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, मनोरंजन कक्ष इत्यादी सोयीसुविधांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा बांबवडे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनु. जाती व नवबौद्ध 80 टक्के, अनु. जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक (9766040998) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000