कळंब तहसीलवर भीमसैनिकाचा विराट मोर्चा धडकला
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने)
संविधान सुरक्षा आंदोलन कळंब जिल्हा धाराशिव यांच्या वतीने सकल कळंब *तालुक्यातील भीम अनुयायांच्या वतीने भव्य दिव्य मोर्चा यशस्वी काढण्यात आला या मोर्चाचे निवेदन मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य,*
*मंत्रालय,मुंबई यांना मा तहसीलदार साहेब कळंब यांच्या मार्फत निवेदन देण्यात*आले*
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी मा. न्यायमूर्ती श्री. अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीश, मा. उच्च न्यायालय, पाटणा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. सदर समितीने मार्च २०२६ मध्ये शासनास आपला अहवाल सादर केला आहे.
तथापि, सदर अहवालाची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व धोरणात्मक आधारावर केली जात आहे, ती अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या अंतर्गत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय निरक्षरतेचा आणि दुफळीचा गैरवापर करून भेदभावाची भावना निर्माण करण्यासाठी हे सगळे करण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती सामाजिक न्याय, समता व भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १५. (भेदभाव बंदी) व अनुच्छेद ४६ (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांचे कल्याण) यांच्या विरोधात आहे.
सर्वप्रथम, आरक्षण वर्गीकरण करण्यास माझा व माझ्या अनुसूचित जाती समुहाचा विरोध आहे हे आपणांस स्पष्ट करू इच्छितो. याविषयी मी व माझ्या समूहाने कधीही मागणी केलेली नाही. तरीहि, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करताना खालील बाबींचे अत्यंत आवश्यक व अपरिहार्य पालन करण्यात यावे. १) स्वतंत्र व अचूक जनगणनाः महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची जातीनिहाय लोकसंख्या मोजण्यासाठी स्वतंत्र व अचूक जनगणना करूनच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे.
२) सर्वसमावेशक उपवर्गीकरणः उपवर्गीकरण केवळ शासकीय नोकरी व शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता, खालील सर्व क्षेत्रांमध्ये लागू करण्यात यावेः५) सर्व ५९ अनुसुचित जातींचा स्वतंत्र अभ्यास करावा
६) एस सी चा बॅकलॉग भरून काढावा तसेच रिक्त पदे भरावीत.
७) न्यायधीशांच्या नियुक्ति मध्ये आरक्षण लागु करावे
८) एस सी आरक्षण मर्यादा वाढवुन २०% करण्यात यावे.
महोदय, ही केवळ मागणी नसून सामाजिक न्याय, समता आणि घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जर या विषयावर तातडीने व योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर सामाजिक असंतोष तीव्र होऊन व्यापक जन-आंदोलन आजच्या मार्चापेक्षाही तिव्र पणे उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्या स्तरावरून शासन व प्रशासनास तातडीने योग्य ते निर्देश देण्यात येऊन, यासंदर्भात न्याय्य व पारदर्शक प्रक्रिया होण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही नम्र परंतु विनंती.
तरी आज कळंब जि. धाराशिव मध्ये संविधान सुरक्षा आंदोलन च्या माध्यमातुन कळंब तालुक्यातील सकल भिम अनुयायांच्या वतीने भव्य मोर्चा काढून मा. उपविभागीय अधिकारी साहेब कळंब यांच्या वतीने मा तहसीलदार साहेब कळंब यांच्या मार्फत मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना आज रोजी आरक्षणातील अ.ब.क. ड वर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे या मोर्चात तालुक्यातील व परिसरातील सकल भीम अनुयायांनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघाला व उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे मान्यवरांच्या भाषनाने समाप्ती करण्यात आली