दर्पण न्यूज पलूस :- रामानंदनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयात १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित भव्य ‘सत्कार व संच वाटप’ सोहळ्यात ते बोलत होते. स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदिप (आप्पा) कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि आमिर (भैय्या) पठाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
“रामानंदनगर ही एकेकाळी तालुक्यातील अत्यंत मोठी आणि गजबजलेली बाजारपेठ होती. कामगारांच्या गर्दीने येथील रस्ते फुलून जायचे. रामानंदनगरचे तेच वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन पलूस-कडेगावचे लोकप्रिय नेते प्रदिप (आप्पा) कदम यांनी केले.
आपल्या भाषणात प्रदीप कदम पुढे म्हणाले की, “स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा चालवत आम्ही सामाजिक कामात सदैव अग्रेसर राहू. अमीर भैय्यांच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना दीड कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे, हे उद्दिष्ट आता १५० कोटींवर नेण्याचा आमचा मानस आहे.”
कामगारांना सुरक्षा व संसार संच वाटप
यावेळी शेकडो बांधकाम कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी ‘सुरक्षा संच’, दैनंदिन गरजेसाठी ‘अत्यावश्यक संच’ आणि ‘संसार संचाचे’ वाटप करण्यात आले. कामगारांच्या घामाची कदर करणारा हा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण कामगार पुरस्कार विजेते विजय पिसे (साहेब) आणि गुणवंत कामगार पुरस्कार विजेते संगाप्पा करोले यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेले शामराव कुंभार, स्वप्निल माने आणि मुंबई लोहमार्ग पोलीस पदी नियुक्ती झालेले अमरसिंह संतोष तुपे यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श समाज भूषण पुरस्काराबद्दल रियाज पठाण आणि कंत्राटदार विलास जाधव यांचाही सत्कार झाला.
काळाची गरज ओळखून रामानंदनगरचे जनसंपर्क कार्यालय आता पूर्णपणे डिजिटल (संगणकीकृत) करण्यात आले आहे. प्रदिप (आप्पा) कदम यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले. कार्यालयाच्या कामकाजाचा श्रीगणेशा गरजू नागरिकांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ वाटप करून करण्यात आला.
या सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक आमिर (भैय्या) पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अभिजीत सावंत यांनी केले, तर आभार हरीश वडार यांनी मानले.
या प्रसंगी संदीप वाघमारे, कृष्णा मिठारी, नौशाद पठाण, विजय पाटील, बाबासाहेब इनामदार, विलास सुतार, झाकीर पटेल, जमिर पठाण, संजय दादा शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, दौलत पाटील, अंकुश गस्ते यांच्यासह सौ. सरीता कुंभार, सौ. परवीन इनामदार, शोभा वडुलकर, सौ. आयेशा मुल्ला, रूक्सान मुलाणी, सौ. मंजिरी शिंदे, कुडचिकर मॅडम, हाफिजा पटेल, दिपाली देशमुख व शाबाज नदाफ उपस्थित होते.”रामानंदनगर ही एकेकाळी तालुक्यातील अत्यंत मोठी आणि गजबजलेली बाजारपेठ होती. कामगारांच्या गर्दीने येथील रस्ते फुलून जायचे. रामानंदनगरचे तेच वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन पलूस-कडेगावचे लोकप्रिय नेते प्रदिप (आप्पा) कदम यांनी केले.
रामानंदनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयात १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित भव्य ‘सत्कार व संच वाटप’ सोहळ्यात ते बोलत होते. स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदिप (आप्पा) कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि आमिर (भैय्या) पठाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
आपल्या भाषणात प्रदीप कदम पुढे म्हणाले की, “स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा चालवत आम्ही सामाजिक कामात सदैव अग्रेसर राहू. अमीर भैय्यांच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना दीड कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे, हे उद्दिष्ट आता १५० कोटींवर नेण्याचा आमचा मानस आहे.”
कामगारांना सुरक्षा व संसार संच वाटप
यावेळी शेकडो बांधकाम कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी ‘सुरक्षा संच’, दैनंदिन गरजेसाठी ‘अत्यावश्यक संच’ आणि ‘संसार संचाचे’ वाटप करण्यात आले. कामगारांच्या घामाची कदर करणारा हा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण कामगार पुरस्कार विजेते विजय पिसे (साहेब) आणि गुणवंत कामगार पुरस्कार विजेते संगाप्पा करोले यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेले शामराव कुंभार, स्वप्निल माने आणि मुंबई लोहमार्ग पोलीस पदी नियुक्ती झालेले अमरसिंह संतोष तुपे यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श समाज भूषण पुरस्काराबद्दल रियाज पठाण आणि कंत्राटदार विलास जाधव यांचाही सत्कार झाला.
काळाची गरज ओळखून रामानंदनगरचे जनसंपर्क कार्यालय आता पूर्णपणे डिजिटल (संगणकीकृत) करण्यात आले आहे. प्रदिप (आप्पा) कदम यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले. कार्यालयाच्या कामकाजाचा श्रीगणेशा गरजू नागरिकांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ वाटप करून करण्यात आला.
या सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक आमिर (भैय्या) पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अभिजीत सावंत यांनी केले, तर आभार हरीश वडार यांनी मानले.
या प्रसंगी संदीप वाघमारे, कृष्णा मिठारी, नौशाद पठाण, विजय पाटील, बाबासाहेब इनामदार, विलास सुतार, झाकीर पटेल, जमिर पठाण, संजय दादा शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, दौलत पाटील, अंकुश गस्ते यांच्यासह सौ. सरीता कुंभार, सौ. परवीन इनामदार, शोभा वडुलकर, सौ. आयेशा मुल्ला, रूक्सान मुलाणी, सौ. मंजिरी शिंदे, कुडचिकर मॅडम, हाफिजा पटेल, दिपाली देशमुख व शाबाज नदाफ उपस्थित होते.