दर्पण न्यूज मिरज / सांगली : राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकिय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ गुरूवार, दि. 30 एप्रिल 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता किर्लोस्करवाडी, जि. सांगली येथे आगमन व राखीव. सकाळी 9.45 वाजता किर्लोस्कर कमिंन्सच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.45 वाजता किर्लोस्करवाडी, जि. सांगली येथून हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे प्रयाण.