दर्पण न्यूज भिलवडी – : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार यावर्षी सौ उर्मिला डीसले यांना जाहीर झालेला आहे. 12 मे 2026 रोजी एका विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी या पुरस्काराची नुकतीच घोषणा केलेली आहे. श्री डी आर कदम,सुभाष कवडे जयंत केळकर आणि अध्यक्ष गिरीश चितळे ग्रंथापाल सौ मयुरी नलवडे, सौ विद्या निकम यांच्या निवड समितीने या पुरस्काराचे नाव निश्चित केलेले आहे उत्तम पुस्तकांचे वाचन वाचनालयाच्या उपक्रमांना नियमित उपस्थिती वाचन कट्ट्याच्या प्रारंभापासून वाचन कट्ट्यातील सहभाग वाचनालयाच्या महापुरुषांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने वेळोवेळी व्याख्याने या बाबींचा विचार करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.