महाराष्ट्रराजकीय
सूर्यगाव येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे, जितेश बनसोडे यांच्या प्रचाराला महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



दर्पण न्यूज भिलवडी अंकलखोप (अभिजीत रांजणे)-: सूर्यगाव येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अंकलखोप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुदीप भैय्या गडदे आणि अंकलखोप समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार जितेश भैया बनसोडे यांचा प्रचार सूर्यगाव येथे करण्यात आला.काँग्रेस पक्षाच्या पलूस तालुका युवक उपाध्यक्षा प्रणाली पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. सूर्यगाव येथे यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना महिला ग्रामस्थ मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




